मुरुड श्रीदत्तमंदिरात लघुरुद्र कार्यक्रम

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहराजवळील श्रीगुरुदेव दत्तमंदिरात श्री दत्तयाग व लघुरुद्र कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (दि.5) रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासून श्री दत्तयाग व लघुरुद्र, दुपारी 12-00 महाआरती, दुपारी 12-30 ते 3-00 महाप्रसाद तर सायंकाळी संगीत भजनचा कार्यक्रम रघुनाथ खंडाळकर, शुभम खंडाळकर यांचा होणार आहे. याला तबला साथ सोहम गोराणे, पखवाज साथ साईराज गुरव देणार आहेत. तरी या कार्यक्रमास दत्तभक्तांनी उपस्थित रहावे ही विनंती श्री दत्तदेवस्थान ट्रस्ट मंडळ मुरुड-जंजिरा अध्यक्ष -प्रमोद दत्तात्रेय भायदे व श्री दत्तदेवस्थान ट्रस्ट मंडळ मुरुड-जंजिरा व कार्यकारीणी सदस्य श्री दत्त देवस्थान पुजा समिती, उत्सव समिती व दत्तयाग व लघुरुद्र समिती सर्व समाज अध्यक्ष व पाखाडी अध्यक्ष यांनी केली आहे.

Exit mobile version