| पनवेल | वार्ताहर |
एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. खांदा वसाहतीमधील सेक्टर 11 येथे राहणारे भूषण बेर्डे हे घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास 3 लाख 54 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.