| पनवेल | वार्ताहर |
घराखाली असलेल्या दुकानातून खाऊ घेऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका 16 वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चिंचपाडा येथे राहणार्या 16 वर्षीय तरुणीचे अपहरण झाले आहे. तिचा रंग सावळा, बांधा पातळ, डोळे घारे, केस लांब असून अंगात गडद रंगाचा टॉप व निळ्या रंगाची बॅगी जिन्स घातलेली आहे. तिला मराठी भाषा अवगत आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 येथे संपर्क साधावा.