| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरातून शेवरलेट एन्जॉय गाडीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. प्रदीप पराड यांची गाडी क्र. एमएच-04-एचएफ-0988 ग्रे रंगाची ही गाडी ज्याची किंमत जवळपास 2 लाख 20 हजार अशी असून, ही गाडी त्यांनी वडाळे तलाव परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.