| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथील किशोर पाटील यांचे ओएनजीसी गेटच्या बाजूला आर्यन बिअर शॉपी आहे. त्यांच्या बियर शॉपीमध्ये हिरेश सुनील सुतार हा काम करतो. 2024 मध्ये त्याने बियरच्या विक्रीमध्ये अडीच लाखांची अपरातफर केली होती. त्यावेळी त्याने अफरातफर केल्याचे मान्य देखील केले होते. त्याने अफरातफरीची रक्कम पगारातून कापून घेण्यास सांगितल्याने त्याला पुन्हा कामावर ठेवण्यात आले होते. दरम्यान, किशोर पाटील हे शॉपवर आले असता त्यांना दुकानातील माल कमी वाटल्याने त्यांनी हिरेशला शॉपवर येण्यास सांगितले होते. काही वेळाने त्याला पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्याच्या वडिलांना फोन करून हिरेशला लवकर शॉपवर पाठवा, असे सांगितले. मात्र, तो आलाच नाही. त्यांनी दुकानातील बियरचे पॅक बॉक्स चेक केले असता ते बॉक्स रिकामे होते. हिरेशने रिकामे बॉक्स पॅक करून ठेवले होते. शॉपमध्ये रजिस्टर व माल चेक करून पाहिले असता जवळपास 7 लाख 18 हजार रुपयांचा माल दिसून आला नाही. तसेच, ओपनिंगची 30 हजार रुपयांची रोख रक्कम देखील चोरून नेल्याचे लक्षात येताच हिरेश सुतार याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.






