लालबाग हादरले! स्फोटात चार जण गंभीर जखमी

| मुंबई | प्रतिनिधी |

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने मुंबईतील लालबाग परिसर हादरला आहे. आज पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या चारही जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

ही सिलिंडर स्फोटाची घटना लालबागच्या डॉ. एस. एस राव मार्गावरील मेघवाडीतील इमारत नंबर 3 मध्ये घडली आहे. या इमारतीतील राणे यांच्या घरात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या घराला आग लागली. यात राणेंच्या घरातील साहित्य, कपडे जळून खाक झाले, तर चौघे जण जखमी झाले आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये कुंदा मिलिंद राणे (48), अथर्व मिलिंद राणे (10), वैष्णवी मिलिंद राणे (10) आणि वैष्णवी मिलिंद राणे (10) यांचा समावेश आहे. यात कुंदा या 70 ते 80 टक्के भाजल्या आहेत, तर अनिकेत विलास डिचवलकर 60 ते 70 टक्के भाजला आहे. राणे यांची मुले अथर्व आणि वैष्णवी यांना 15-20 टक्के भाजले आहेत. दरम्यान स्फोटातील जखमी कुंदा राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. दुसरीकडे अनिकेत डिचवलकरवर या तरुणाला मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली.

Exit mobile version