सुधागडात लंपी स्किन डिजस रोगाचा थैमान

शेकडो जनावरे रोगाच्या संसर्गाने बाधीत 
| सुधागड/ पाली | विनोद भोईर |
सुधागड तालुक्यात  लंपी स्किन डिजस या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून तालुक्यातील अंदाजे 15 हजार जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणून या गंभीर रोगा संदर्भात सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्ना वर यांनी पाली तहसील कार्यालयात नुकतीच  बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, सभापती रमेश सुतार,पंचायत समिती सदस्या सविता हंबिर , डॉक्टर प्रशांत कोकरे, डॉक्टर रोहिणी दाभोळकर उपस्थित होते. यावेळी लंपी स्किन डिजस रोगाला कसे नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना तालुक्यातील लंपी स्किन डिजस रोगाचा व उपचारासाठी  तसेच लसीकरणासाठी  कमी पडत असलेल्या डॉक्टर, कर्मचारी व मनुष्यबळाचा आढावा दूरध्वनी द्वारा देऊन त्यांच्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. तसेच ज्या तालुक्यात लंपी स्किन डिजस रोगाचा संसर्ग नाही त्या तालुक्यातील पशुधन अधिकारी यांची टीम सुधागड तालुक्यात लसीकरणासाठी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लवकरात लवकर या रोगाचे निवारण होईल अशा सूचना व विनंती संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी खैरे यांनी केली. 

संपूर्ण  जगभरासह भारत देशात कोरोना संसर्ग जन्य रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे शासन प्रशासन तसेच प्रत्येक मानव या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी झालेल्या रोगाला लढा देण्यासाठी अनेक उपाय योजना करत आहेत. मात्र अशीच गंभीर परिस्थिती मुक्या जनावरांची  लंपी स्किन डिजस या रोगाने केली आहे . रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये या  संसर्गजन्य रोगाने जनावरे मोठ्या प्रमाणात बाधीत झालेले आढळून आले आहेत त्यामध्ये सुधागड तालुक्यात लंपी स्किन डिजस रोगाने बाधीत झालेल्या जनावरांचे प्रमाण जास्त असून तालुक्यातील पशुधन विभागातील डॉक्टर व त्यांचे कर्मचारी जनावरांवर उपचार करत आहेत मात्र तालुक्यात बाधित जनावरांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे परंतु तालुक्यात डॉक्टर  कर्मचाऱ्यांची यांची संख्या कमी आहे आणि मुक्या जनावरांवर उपचार होणे अतिशय महत्वाचे असल्याकारणाने शासनाने तातडीने लंपी स्किन डिजस या रोगाचे निवारण करण्यासाठी उपायोजना करावे असे तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये  लंपी स्किन डिजस या रोगामुळे कोणत्याही जनावरचे मृत्यू होत नाही. फक्त ज्या कोणाची जनावरे या रोगाने बाधीत झाली असतील तर लवकरात लवकर पशुधन विभागाकडे संपर्क साधावा.

– डॉ.प्रशांत कोकरे, पशुधन अधिकारी सुधागड पाली
Exit mobile version