। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे काल रात्री आठच्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये 16 घरे ढिगार्याखाली गाडली गेली. एनडीआरएफच्या टिमने मदतकार्य सुरु केले असून आत्तापर्यंत 5 मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये एक मुलगी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
अशातच बोरस व साखर या दरम्यानचा पूल पावसामुळे कोसळला. त्यामुळे मदतकार्य करणार्या जवानांना जवळपास 4 किमी मृतदेह चालत आणावे लागले. या घटनेतील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. तर जखमींना महाड येथे हलविण्यात आले आहे.