| पनवेल | प्रतिनिधी |
सततधार पावसामुळे तालुक्यातील वरचे ओवळे गावात भूस्खलन झल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई विमानताळामुळे विस्थापित झालेल्या वरचे औवळे गावाचे पळस्पा-जेएनपीटी महामार्गवरील डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन करण्यात आले असून, त्या ठिकाणी भूस्खलनाची ही घटना घडली आहे.
खालापूर तालुक्यातील इर्शालगड येथे भूस्खलन होण्याची घटना ताजी असतानाच वरच्या औवल्यात घडलेल्या या घटने मुळे परिसरात घाबराट पसरली आहे. नवी मुंबई विमनातळाकरता तालुक्यातील 10 गावांची जमीन संपादित करण्यात आली असल्याने या गावांतील नागरिकांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या गावापैकी वरचे ओवळे या गावाचे पुनर्वसन डोगराच्या पायथ्याशी करण्यात आले आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डोंगराचा काही भाग वाहून आल्याने परिसरातील रहिवाशी संस्थामध्ये मातीचा चिखल पसरला आहे. सिडकोने वसवलेल्या ग्रामस्थांच्या या वसाहतीत भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने सिडको प्रशासनाने सावधानतेचा इशारे देणारे केवळ फलक लावून भूस्खलन रोखण्यासाठी कोणत्याही उपाय योजना राबवल्या नसल्याचे या घटने नंतर स्पष्ट झाले आहे.