लखनऊच्या प्रशिक्षपदी लँगर

| नवी दिल्ली | वार्ताहर |

आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने जस्टिन लँगरला आपल्या संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. याआधी, अँडी फ्लॉवर सुरुवातीच्या दोन हंगामात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. अँडी फ्लॉवरचा लखनऊ फ्रँचायझीसोबत दोन वर्षांचा करार होता, जो या वर्षीच्या हंगामाच्या शेवटी संपला. जस्टिन लँगरने 2021 साली झालेल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून देण्यात प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Exit mobile version