स्व. दत्तूशेठ पाटीलांच्या स्मारकाचे होणार अनावरण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

शरद पवार यांच्यासह शेकापचे नेते जयंत पाटील यांची उपस्थिती असणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आत्मारा धोंडू म्हात्रे ज्युनिअर कॉलेज व आयटीआय या ठिकाणी माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तुशेठ पाटील यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे. मंगळवारी (दि. 8) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा सोहळा पार पडणार आहे.

रयत शिक्षण संस्था, साताराचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्था, सातारा येथील चेअरमन, चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, सांगोल्यातील शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आ. दत्तात्रेय सावंत, तसेच शेकापचे नेते, रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे चेअरमन माजी आ. बाळाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version