महिलांसाठी लाठी-काठी स्पर्धा

। उरण । प्रतिनिधी ।

शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडेमधील महिलांसाठी लाठी-काठी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. यावेळी शिव प्रतिष्ठान व शिव मावळे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील एकच हेतू आहे की, समाजातील महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः कसे करावे, हे यातून साध्य करण्यात आले. यावेळी सत्यजित पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस दररोज मुंबई, पुणे यासारख्या शहरातून दररोज 3 ते 4 मुली गायब होत आहेत. अनेक मुलींवर, महिलांवर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुली व महिलांवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचारला विरोध करण्यासाठी मुलींना व महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version