। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानमार्फत महाजीविका अभियानफ राज्यस्तरीय शुभारंभ बुधवारी ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ.राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधणी करून त्यांचे सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आरक्षण असल्याने त्यांची प्रगती दिसून येत आहे.हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अपर मुख्य सचिव राजेशकुमार उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पनवेल येथील वीरभद्र आणि स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत कोविड महामारीत मृत झालेल्या पुरुष कुटुंबातील विधवांचे विशेष समूह बनवून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला हातभार लावणार साठी स्वरूपात आर्थिक मदत शासनामार्फत करण्यात आली त्या विशेष स्वयं सहाय्यता समूहांना मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे आर से टी मार्फत प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योग करणार्या पेण तालुक्यातील राजश्री भगवान जाधव या यशस्वी महिला उद्योजक या महिलेचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश चंद्रकांत राऊळ आर सिटी संचालक, रायगड आनंद राठोड, तालुका अभियान व्यवस्थापक हर्षल परब उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले असून ग्रामविकास विभागाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी आभार मानले.