। अलिबाग । वार्ताहर ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे आदी मार्गदर्शक उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा.पल्लवी पाटील यांनी स्त्रीच्या साहित्यिक रूपाचे वर्णन केले. प्रा.प्रीती पाटील यांनी महिला दिन साजरा करण्याबाबतची ऐतिहासिक पार्श्वभूमी व्यक्त केली. प्रा. नम्रता पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता करताना जीवनात आलेले अनुभव, स्त्रीच्या भूमिकेतील वास्तविकता आणि स्त्री साहित्य याविषयी आपली भूमिका मांडली. महिला विकास सदस्या प्रा. पल्लवी पाटील त्याचबरोबर प्रा.नम्रता चोगले, प्रा.वृषाली घरत, प्रा.अमिता महाले, प्रा.प्रतीक्षा पाटील ,प्रा. योगिता पाटील, प्रणाली पाटील,प्रा.तेजश्री तांबे, प्रा.स्नेहा घरत, प्रा.पूजा पाटील,प्रा.अपूर्वा पवार,कांचन म्हात्रे, प्रा.चेतना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पल्लवी पाटील यांनी केले.