लिलाबाई केवलसामुथा यांचे निधन

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे बाजारपेठेतील रहिवासी लिलाबाई हरकचंदजी केवलसामुथा (वय 80) यांचे सोमवारी (दि.18) वयोवृध्दत्वामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रिपाल, दिलिप, ललित व अजित हे चार विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नागोठण्यातील अंबा घाटावरील स्मशानभूमीत सोमवारी (दि.18) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जैन बांधवांसह नागोठणे पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. दिवंगत लीलाबाई यांचे ‘उठामना विधी’ बुधवारी (दि.20) सकाळी 10 वा. त्यांचे राहते घरी तर ‘शत्रुंजय भावयात्रा व स्वामिवात्सल्य’ विधी सकाळी 11 ते 1 वा. दरम्यान नागोठण्यतील आराधना भवन येथे होणार असल्याचे केवलसामुथा परिवाराकडून सांगण्यात आले.

Exit mobile version