| दिघी | वार्ताहर |
विधी सेवा समिती श्रीवर्धन व वकील संघटना श्रीवर्धन यांच्या माध्यमातून गोंडघर येथील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रीवर्धन वकील संघटनेचे ॲड. संतोष सापते, ॲड. मनिष लाड, ॲड. झोहेब शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. तरुण वर्गातील व्यसनाधीनता आणि सायबर क्राईम या विषयावर संतोष सापते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, व्यसनांचा परिणाम शरीर, मन, आरोग्यावर कसा होतो यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य इमरान शेख माजी प्राचार्य जावेद शेख, जुबेर शेख, हनीफ शेख, न्यायालयीन कर्मचारी अलोक श्रीवर्धनकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती
