| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ॲड.दत्ता पाटील कॅालेज ऑफ लॅा, अलिबाग, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॅारिटी आणि प्रयास(अ प्रोजेक्ट ऑफ टाटा ईन्स्टिट्युशन ऑफन सोशल सायन्सेस)यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विधीसेवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ॲड.दत्ता पाटील कॅालेज ऑफ लॅामध्ये करण्यात आले. जनता शिक्षण मडळाचे अध्यक्ष मा. ॲड.गौतमभाई पाटील यांच्याहस्ते शिबीराचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे तसेच. ॲड.सुजाता जगताप,ॲड.पठाण, सामाजिक कार्यकर्ते श्री.मनोहर फणसेकर देखिल उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विधी सेवा स्वयंसेवक म्हणुन नियुक्त झालेले 30 विद्यार्थी उपस्थित होते. विविध व्याख्यात्यांची विविध विषयावरील व्याख्याने सकाळी ते संध्याकाळी यावेळेत आयोजित करण्यात आली होती. शिबिराच्या पहिल्या दिवशी ॲड.सुजाता जगताप यांनी भारताच्या संविधानवर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच ॲड. निलेश मोहिते यांनी डी.के.बासू केससंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा केली.सामाजिक कार्यकर्ते श्री .मनोहर फणसेकर यांनी तुरूंगाच्या संरचनेवर व्याख्यान दिले.ॲड.पठाण यांनी लिगल सर्व्हिसेस अथॅारिटिज अॅक्ट विषयी माहिती दिली.
शिबिराच्या दुस-या दिवशी ॲड.गुंजाळ यांनी गुन्हा आणि जामिनाचे प्रकार, ॲड.निहा राऊत यांनी महिलांसाठी असलेले कायदे, ॲड.अशोक पाटील यांनी प्रोबेशन ऑफेन्डर्स अॅक्ट, ॲड.तुळपुळे यांनी लहान मुलांसंदर्भात असलेले कायदे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश अमोल शिंदे यांनी विधीसेवा स्वयंसेवकांची जबाबदारी आणि अधिकार तसेच तुरुंगाधिकारी श्री.कारकर यांनी तुरुंग संरचनेविषयी व्याख्यान दिले.जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनखाली महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहाय्याने शिबीराचे यशस्वी आयोजन केले.ॲड.नीलम हजारे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहाय्याने शिबीराचे यशस्वी आयोजन केले.