श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

श्रीरामपूर | प्रतिनिधी |
शहरातील मोरगे वस्ती परिसरात घुसलेल्या नर जातीच्या बिबट्याने धुमाकूळ घालुन, दोन मुले आणि इतर पाच जणांवर हल्ला चढवुन गंभीर जखमी केले. त्यामुळे शहर परिसरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरल्याने गोंधळ उडाला होता. बिबट्याला बघण्यासाठी मोरगे वस्ती परिसरात शेकडो नागरीकांनी गर्दी केली होती. परिणामी, बिबट्या सैरभैर होवून त्याने एका पाठोपाठ तब्बल सात जणांनावर हल्ले करुन जखमी केले. त्यांना शहरातील कामगार रुग्णालयासह व बधे हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील सिव्हिल रुगालयात हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version