पोलादपूरचा नियोजनबध्द विकास करु – दरेकर

पोलादपूर | प्रतिनिधी |
केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपसरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ पोलादपूर शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी करून द्यायचा असेल भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांनी येथे केले. पोलादपूर शहर भाजपा महिला संघटक उज्वला मराठे तथा माई शेठ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ. प्रवीण दरेकर बोलत होते. याप्रसंगी बिपीन महामुणकर, मनोज भागवत, राजेंद्र धुमाळ, प्रसन्ना पालांडे, माई शेठ, संदीप ठोंबरे, कालिका अधिकारी तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version