। चिपळूण । प्रतिनिधी ।
भाजपाच्या चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे असे सांगून उपस्थित पदाधिकार्यांना प्रबोधन केले. तसेच त्यांनी भाजपची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, विनोद भोबसकर, आशिष खातू, स्मिता जावकर,केदार साठे, मकरंद म्हादलेकर, अनिकेत कानडे,राजु रेडीज,संतोष मालप, अनिकेत पटवर्धन, रसिका देवळेकर,नुपूर बाचीम, निशिकांत भोजने, परिमल भोसले, वैशाली निमकर, प्रणय वाडकर,अतुल गोंदकर, महेश दिक्षित, रत्नदीप देवळेकर,संजय सावंत,जयु साळवी, सीमा महाडिक,प्रतिज्ञा कांबळी,संदेश ओक,सोमनाथ सुरवसे, मंदार कदम,संदीप महाडिक आदी उपस्थित होते.