वडीलांच्या खुना प्रकरणी मुलास जन्मठेप

| माणगाव | प्रतिनिधी |

मुलाने वडिलांकडे मोबाईल मागितल्याने वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने मुलाने वडिलांना रागात लाकडी चोपण्याने डोक्यावर, कपाळावर मारून जखमी करून ठार मारण्याची घटना तळा तालुक्यातील वरळ गावचे हद्दीत मयत याचे राहते घरात दि.18 जानेवारी 2021 रोजी घडली होती. 

गुन्हयातील आरोपी भावेश भागुराम काप याने मयत वडिल भागुराम धर्मा काप यांचेकडे मोबाईल मागत होता व वडिलांनी मोबाईल दिला नाही या गोष्टीचा मनात राग धरून वडिल व मुलांमध्ये बाचाबाची व झटापट होवून आरोपी मुलाने लाकडी चोपना हातात घेवून वडिलांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले व जिवे ठार मारले. या प्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मुलगा भावेश भागुराम काप यास घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर मंगळवार (दि.13) महत्वपूर्ण निर्णय देऊन जन्मठेपेची शिक्षा व रू. 15,000/- दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version