। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पाली येथे बुधवारी (दि.25) सायंकाळी तुफान पाऊस पडला. या पावसामुळे येथील खडकआळी व प्रबुद्ध नगर जवळील घरांमध्ये पाणी शिरले होते. या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच, पावसामुळे येथील नाले भरल्यामुळे अतिरिक्त पाणी रस्त्यावर वाहू लागले होते. यामुळे काही रहिवाशींच्या ओटीवर व घरात पाणी शिरले होते. यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली. अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. यामुळे रस्त्यावरून जाणार्या पादचारी व वाहनांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.