। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी महिला आघाडी सज्ज आहे, असा निर्धार महिला आघाडी संवाद बैठकीत महिला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या सेनाभवनातील पक्षाच्या पदाधिकार्यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीची संवाद निर्धार बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यासह माजी महापौर स्नेहल आंबेकर, सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, समिक्षा सक्रे, नेहा माने, श्रेया परब, अनिता पाटील, सुमन डोंगरे, करुणा बडेकर, साधना राऊळ, शैला भगत, वैजयंती गायकवाड, सुविधा विचारे, रंजना राणे, सुजाता मनवे, धनश्री चंदन, नीता मांडे, मीना कुलकर्णी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.