| उरण | वार्ताहर |
उरण पंचायत समितीच्या कार्यालयातून तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम केले जाते. मात्र अशा शासकीय कार्यालयाच्या आवारात सध्या दारुच्या बाटल्या आढळून येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या उरण पंचायत समितीच्या कार्यालयातून उरण तालुक्यातील 33 ग्रामपंचायत हद्दीतील गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम शासकीय अधिकारी वर्गांच्या देखरेखीखाली केले जाते. मात्र अशा शासकीय कार्यालयाच्या आवारात सध्या दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत. त्यामुळे याठिकाणी दारुच्या बाटल्या येतात कशा?, कोण-कोण दारुच्या पार्ट्यांमध्ये रंगून जात आहे, याबाबत संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
उरण पंचायत समितीच्या कार्यालयात दारुच्या बाटल्या

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;