| सोगाव | वार्ताहर |
शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची सुट्टी अशा तीन दिवस सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागातील पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अलिबाग, मुरुडकडे धाव घेतली आहे.
यासाठी पर्यटकांनी गेटवे ते मांडवा या जलद व वेळेची बचत करणार्या जलमार्गावरील प्रवासाला प्राधान्य दिले आहे. शनिवार सकाळपासूनच अलिबागकडे येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी उसळली होती. पीएनपी, अजंठा, अपोलो, मालदार या बोटीने मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहेत. यामुळे अलिबागमध्ये हॉटेल, लॉज, कॉटेजेस, घरगुती खानावळ आदी सेवा देणारे व्यवसाय हे ‘फुल्ल’ झाले आहेत. पर्यटकांच्या महापुरामुळे या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.