संवर्धनाच्या नावाखाली जैवविविधतेचा र्‍हास?

। पनवेल । प्रतिनधी ।

पनवेलच्या वडाळे तलावतील जैवविविधता टिकवण्यासाठी निसर्गप्रेमी संस्था काम करत आहेत. मात्र, त्याच वेळी तलावतील जैवविविधता टीकवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या वनस्पती काढण्याचे काम पालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले आहे. यामुळे तलावातील जैवविविधताधोक्यात येणार असल्याने निसर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


ऐतिहासिक महत्व असलेल्या पनवेलच्या वडाळे तलावात विविध प्रकारच्या पशुपक्षांचा अधिवास आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक प्रवासी पक्षी वडाळे तलावात वास्तव्यासाठी येत असतात. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामामुळे तलावातील अनेक जलपर्णी वनस्पती नष्ट झाल्याने काही वर्षांपासून विविध प्रकारचे पक्षी तलावपासून दुरावाले होते. आता तलावाच्या सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात कमळ तसेच जैववीवीधता टीकवण्यासाठी महत्वाची भूमिका बाजवणार्‍या वनस्पतींच्या संख्येत वाढ होऊन तलावापासून दुरावलेल्या पक्षाच्या काही प्रजाती पुन्हा परतु लागल्या आहेत. परंतु, असे असतानाच पालिकेमार्फत तलावातील जलपर्णी वनस्पती काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तलावातील पक्षांचा अधिवास नष्ट होण्याच्या भीतीने निसर्ग प्रेमी व स्थानीक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तलावातील जैववीवीधतेला धोका पोहचवणार्‍या जलपर्णी काढण्याचे काम पालिका प्रशासन वर्षभर करत आहे. तलावातील पाणी स्वच्छ रहावे या दृष्टीने हे काम केल जात आहे. यात जैवविविधता धोक्यात येईल आशा वनस्पती काढल्या जात नाहीत.

संजय कटेकर,
अधिकारी
Exit mobile version