एलॉन मस्क यांनी गमावली; 50 अब्ज डॉलर्सची संपत्ती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत 50 अब्ज डॉलरची घट झाली आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये सलग दुसर्‍या दिवशी झालेली घसरण हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या इतिहासात अवघ्या दोन दिवसांत अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात सर्वाधिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीतही मस्क दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहेत. एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा विक्रम अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या नावावर आहे. 

Exit mobile version