नफ्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

| पनवेल | प्रतिनिधी |

शेअर बाजार आणि विमा योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 6 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2025 ते 19 जून या कालावधीत आरोपी प्रदीप नरळे याने तक्रारदाराला शेअर बाजारातील एनएफओ तसेच विमा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगितले. विविध कारणे देत वेळोवेळी त्याच्याकडून एकूण 6 लाख 36 हजार 2 रुपये स्वीकारले. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा दिला नाही. तसेच, भरलेली रक्कमही परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Exit mobile version