| शिहू | वार्ताहर |
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे कार्यरत असणारे शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रावजी फसाळे यांची कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.
या निवडीबद्दल डहाणू प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा कळमदेवीचे मुख्याध्यापक प्रवीण मिठेवाड, तवा आश्रमशाळा मुख्याध्यापक संतोष सागर, अधीक्षक प्रज्ञाशील पोहणकर, नितीश म्हात्रे, योगेश पाटील, रामा सुतक, पांडुरंग निरगुडे, जगदीश मेंगाळ, मिथुन जोगळेकर, योगेश धुमाळ, मनोज बागुल, शशिकांत सोनावणे, मंगेश उकिरडे, अलिशा पाटील, शामल पाटील, विजया पाटील, नितेश म्हात्रे, प्रफुल्ल नागोठणेकर यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
फसाळे हे नागोठणेनजीक असलेल्या शिहू ग्रामपंचायत हद्दीतील बोरावाडी या गावचे रहिवासी आहेत. आदिवासी कुटुंबात जन्मले असताना अत्यंत दुर्गम भाग, घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा त्यांनी आश्रमशाळेत राहून आपले शिक्षण पूर्ण केले. 31 वर्ष शिक्षक, अधीक्षक व मुख्याध्यापक अशी प्रदीर्घ कालावधीची सेवा आश्रमशाळेवर केली. त्यांच्या कार्यकाळात सानेगाव आश्रमशाळा सलग तीन वेळा जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये पेण प्रकल्पात चॅम्पियन ठरली. तत्कालीन क्रीडा शिक्षक रवींद्र कान्हेकर यांची त्यांना साथ लाभली.