मधुकर गायकवाड यांचे निधन

| महाड । प्रतिनिधी ।
गेली अनेक दशके आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजावर होणार्‍या अन्यायावर सतत आवाज उठविणारे निर्भीड, झुंझार नेतृत्व असलेले दलितमित्र मधुकर गायकवाड यांचे 72 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाड आणि परिसरात शोककळा पसरली. शुक्रवारी पाचाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये त्यांचा वावर होता. अलीकडेच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. त्यांनी कायम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला. तालुक्यातील लोकांना न्याय देताना मागे-पुढे पहिले नाही. शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कारानेदेखील सन्मानित केले होते. एक झुंझार आणि रोखठोक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने समजाकारणात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आ. भरत गोगावले यांनी दिली.

Exit mobile version