अलिबागमध्ये आज जादूचे प्रयोग

जादुगार जितेंद्र रघुवीर डोळ्यांना पट्टी बांधून चालविणार गाडी
| अलिबाग | प्रतिनिधी |
जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जादूचे प्रयोग होणार आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता जादूगार जितेंद्र रघुवीर डोळ्यांना पट्टी बांधून अलिबाग बाजारपेठेतून मोटारसायलक चालविणार आहेत. ज्या रसिकांना हार आणि फुले देऊन स्वागत करायचे असेल, त्यांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहावे, आपल्या फुलांचा स्वीकार करण्यात येईल, असे जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले आहे.

अलिबाग एसटी स्टँडजवळ 5.30 वाजता डोळे बांधण्यात येतील, तिथून पुन्हा बाजारपेठेत फेरी मारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ डोळे सोडण्यात येतील. तसेच रात्री 9 वाजता आणि रविवारी सायंकाळी सात वाजता मेघा चित्र मंदिर, अलिबाग जादूगार विजय रघुवीर-जितेंद्र रघुवीर व पितापुत्रांचा प्रयोग होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असा आवाहन जितेंद्र रघुवीर, संदीप गोठीवरेकर, विकास पावसकर यांनी केले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी तिकिटाचे दर खास रू 500, रू 400 आणि रू 300 असे ठेवण्यात आले आहेत. तर, शालेय विद्यार्थ्यांना तिकिटावर रु. 100 ची खास सवलत देण्यात आली आहे. बुकिंगसाठी पावसकर 9920629923, 9822777527, संदीप गोठीवरेकर : 9527686100 यांच्याशी संपर्क साधावा. विनायक एजन्सी, बालाजी नाका, अलिबाग येथे तिकीट विक्री सुरू आहे.

Exit mobile version