मॅजिक टॅक्सी उलटली नदी पात्रात; प्रवासी बालबाल बचावले

। उरण । वार्ताहर ।
गव्हाण फाटा रस्त्यावरुन चिरनेर गावाकडे जाणार्‍या मॅजिक टॅक्सीने विंधणे येथील रस्त्यावर पार्किंग करुन ठेवलेल्या मोटारसायकला जोरात धडक दिली. या अपघातात मॅजिक टॅक्सी व मोटारसायकल नदी पात्रात पडली आहे. या अपघातात मॅजिक टॅक्सीमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गव्हाण फाटा येथून प्रवासी घेऊन चिरनेर गावाकडे जाणार्‍या मॅजिक टॅक्सीने विंधणे येथील वळणदार रस्त्यावर पार्किंग करुन ठेवलेल्या मोटारसायकला जोरदार धडक दिली. या अपघातात भरधाव वेगातील मॅजिक टॅक्सी व मोटारसायकल विंधणे नदीच्या पात्रात पुलावरून कोसळली आहे. या अपघातात मॅजिक टॅक्सीमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघाताचा आवाज ऐकून घटना स्थळावर प्रवासी, नागरिकांनी एकच गर्दी केली. मॅजिक टॅक्सीमधील प्रवासी हे नदीच्या पात्रात उंच पुलावरून पडूनही किरकोळ जखमी झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Exit mobile version