| नेरळ | प्रतिनिधी |
कोकण विभाग पत्रकार संघाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये 500 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 200 रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. 800 हून अधिक आदिवासी व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी कोकण पत्रकार संघाने पाथरजमधील मार्गाचीवाडी येथे आदिवासी लोकांना ब्लँकेट वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन प्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक बोराडे, पाथरजच्या सरपंच जोत्स्ना घोडविंदे,राधामीरा ट्रस्टचे व्यवस्थापक रंजन पिल्लई, महेश आगे, ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे, गणेश तिखंडे, ममता जितवानी, तसेचअंकुश घोडविंदे, प्रा.रमेश चव्हाण, जनार्दन पानमंद, शरद तवळे, कांता पादिर, मंगळ केवारी, अश्विन पादिर,सीताराम केवारी आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात डॉ भगवान कराळे ,डॉ निलेश यादव ,डॉ साजुका काठे डॉ संजीवदास राव, डॉ गणेश मेंगाल,डॉ आप्पा गोगाककर यांनी केली.तसेच डॉ कमलेश खाडे, डॉ राकेश पाटील ,डॉ भारद्वाज यांनी तपासण्या केल्या.यावेळी कळंब आणि खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रुग्णांच्या ईसीजी आणि,रक्तचाचण्या केल्या.या शिबिरात सुमारे 200 गरजू रुग्णांना पत्रकार संघाकडून चष्म्याचे वाटप करण्यात आले.तर राधामीरा चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने 800 आदिवासी बांधवाना ब्लँकेट चे महिलांना साड्या व मिठाई चे वाटप केले.तर युनिकोन सिक्युरिटी कडून 25 बेरोजगार तरूणांची रोजगार नोंदणी केली शिबिरात वारे कृषी विद्यालयाच्या शिक्षक विद्यार्थी, तसेच शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अविनाश भोईर ,परिवर्तन फाउंडेशनचे सुनील म्हसे यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केली.