माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांना महाराष्ट्र व मुंबई काँग्रेस तर्फे श्रद्धांजली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे माजी आमदार तथा रायगड जिल्ह्याचे जेष्ठ नेते स्व.मधुकर शंकर ठाकूर, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष स्व.विजय भोसले व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस स्व.दिलीप बेलोसे या जेष्ठ काँग्रेस नेत्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या नेत्यांना मुंबई काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन आज सोमवार दिनांक 19 जुलै 2021 रोजी विभागीय काँग्रेस कमिटी कार्यालय, राजिव गांधी भवन, आझाद मैदान, मुंबई महानगर पालीका मार्ग, मुंबई येथे करण्यात आले होते. या शोकसभेस  आमदार तथा मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्ष  भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version