। खरोशी । वार्ताहर ।
नुकत्याच गुजरात गांधी नगर येथे एल्बो बॉक्सिंग स्पोर्ट फेडरेशन इंडिया ह्यांच्या विद्यमाने गुजरात एल्बो बॉक्सिंग स्पोर्ट असोशिएशनने आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धत आपल्या रायगडच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघातून खेळुन 4 गोल्ड मेडल आणी 4 सिलव्हर मेडल पटकावले हे सर्व खेळाडू रविंद्र म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील स्पर्धेत सहभागी झाले होते.
ह्या स्पर्धेत यशस्वी झालेले रायगडचे खेळाडू कुमार रूद्रेश प्रथमेश पाटील गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल, कुमार मोहीत परशुराम कोठेकर गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल, कुमार गौरव गोरखनाथ म्हात्रे गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल, कुमार आर्यन निलेश म्हात्रे गोल्ड मेडल व सिल्ह्वर मेडल संपादन करुन महाराष्ट्राबरोबर रायगड पेणचे पण नाव उंचावले खेळाडुनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे एल्बो बॉक्सिंग स्पोर्ट फेडरेशन इंडियाचे चेअरमन व युनायटेडचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एल्बो बॉक्सिंग स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष सुरेश कोळी उपाध्यक्ष रविंद्र म्हात्रे तसेच गुजरात एल्बो बॉक्सिंग स्पोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश परमार ,टेक्निकल डायरेक्टर संदीप माने तसेच महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंगचे सहउपाध्यक्ष अविनाश सर ह्यानी मोलाची कामगीरी करुन स्पर्धा यशस्वी केल्या.