| सोलापूर | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केले आहे. सिकंदर शेखवर अवैध शस्त्र तस्करी, राजस्थान आणि हरियाणातील कुख्यात गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप पंजाब पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैलवान सिकंदर शेखचा अवैध शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सिकंदर शेख हा पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी पैलवान सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा कुस्तीपटू आहे. कोल्हापूर इथल्या गंगावेस तालीममध्ये त्यानं लहानपणापासून कुस्तीचे धडे घेतले आहेत. सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून कुस्तीच्या जगात विशेष स्थान निर्माण केलं. हमालाचा मुलगा असलेल्या सिकंदर शेखला महाराष्ट्र राज्यातील कुस्ती क्षेत्रात विशेष स्थान मिळालं होतं. सिकंदर शेखला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्यानं त्याचे वडील रशीद शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलावर पंजाब पोलिसांनी खोटे आरोप लावले आहेत. या प्रकरणात त्याला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी माहिती रशीद शेख यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक
