आंबेघरच्या स्वप्नाली कलमकरला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

। पोयनाड । वार्ताहर ।
स्वप्नाली सुनिल कलमकर हिला राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना, पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण सेना,ऑल इंडीया अ‍ॅन्टी करप्शन पार्लमेंन्ट कमिटी, भारतीय महाक्रांती सेना यांच्या विद्यमाने 30 ऑक्टोबर रोजी रविंद्र्र नाटय मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ पार पडला.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पंकजा मुंडे, डॉ.अविनाश संकुटे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना, कांचना अवस्थी अभिनेत्री उपस्थित होते.

स्वप्नाली आंबेघर -पळी, ता. अलिबाग खेडेगावत राहते. बालपणापासून तिला नृत्याची आवड होती. आई वडीलांचे तिला प्रोत्साहन मिळाल्यामुळे नृत्याचा छंद जोपासला गेला. तीने गावपातळी, तालुका, जिल्हास्तरावर, राज्य स्तरीय नृत्य स्पर्धामध्ये सहभागी होऊन अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

Exit mobile version