। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे मागील 11 महिन्यांत 18 लाख 422 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर केला असून, पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी दिली.