राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर


| मुंबई | प्रतिनिधी |

हैद्राबाद येथे होणाऱ्या 49व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएसने सोमवार (दि.29) 12 जणांचा चमू जाहीर केला. याशिका पुजारी(मुंबई उपनगर पूर्व) हिच्याकडे किशोरी, तर रजत सिंग(मुंबई उपनगर पश्चिम) यांच्याकडे कुमार गटाचे नेतृत्व सोपविण्यात आले.

1 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबाद येथील कसानी कृष्णा मुदियाल आणि जे. एस. गेहलोत अकॅडमीच्या मैदानावर हे सामने होतील. महाराष्ट्राच्या या निवडण्यात आलेल्या संघाचा ठाणे येथील येऊर येथे जोरदार सराव शिबीर प्रशांतदादा फाऊंडेशन व विठ्ठल क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने घेण्यात आले. निवडण्यात आलेला संघ राज्य कबड्डी असोसिएसनचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी जाहीर केला संघ पुढील प्रमाणे,

कुमारी गट संघ 
 याशिका पुजारी(संघनायिका)- मुं. उपनगर पूर्व, झुवेरिया पिंजारी-पुणे ग्रामीण, भूमिका गोरे-पिंपरी-चिंचवड, ऋतुजा अवघडी-कोल्हापूर, अर्चना सरेले-पिंपरी-चिंचवड,  समृद्धी मोहिते-मुं. उपनगर पूर्व,  निकिता लंगोटे -परभणी,  नयना झा -मुं.उपनगर पश्चिम, ऋतुजा आंबी-सांगली,  हरजित कौर संधू - मुं.उपनगर पूर्व, वैभवी जाधव -पुणे ग्रामीण, अनिशा निकम -कोल्हापूर. प्रशिक्षक :- मालोजी भोसले. व्यवस्थापिका :- चंद्रिका केळकर - जोशी.
कुमार गट संघ :-
 रजत सिंग(संघनायक) मुंबई उपनगर पश्चिम,  जयेश महाजन -नंदुरबार,  अनुज गावडे -पुणे ग्रामीण,  वरुण खंडाळे - नंदुरबार, अतुल जाधव - परभणी,  साहिल पाटील -कोल्हापूर,  सिद्धार्थ सौतोने -पिंपरी-चिंचवड, वैभव खाडे - कोल्हापूर, विक्रम परमार -पिंपरी-चिंचवड, यश निंबाळकर -पालघर,  ओम कुडाळे -मुंबई उपनगर पश्चिम,  अभिराज पवार - सांगली. प्रशिक्षक :- शंतनु पांडव. व्यवस्थापक :- समीर खेडेकर, मुख्यव्यवस्थापक:- सुरेश तरे.
Exit mobile version