महाराष्ट्राचा युवा स्टार संदीप वाटवे स्पर्धेत पुरस्काराने सन्मानित

। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्लॅनेट मराठी तसेच सायली कुशल पिक्चर्स क्रियेशन यांच्या वतीने महाराष्ट्राचा युवा स्टार 2022 पहिले पर्व यामध्ये अलिबागचे कलाकार संदीप वाटवे यांना अनेक व्हिडिओ अल्बममध्ये उत्कृष्ठ प्रकारे नकारात्मक भूमिका निभावल्याबद्दल प्लॅनेट मराठी यांच्या तर्फे नटसम्राट निळू फुले रंगमंच पुणे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
छायाचित्रकार म्हणून रायगड जिल्ह्यात काम करता करता अभिनयाची फक्त आवड म्हणून छोटे छोटे रोल करून सुरुवात केली आणि आता ते नवोदित कलाकार म्हणून कला क्षेत्रात काम करत आहेत. कला क्षेत्राचा अनुभव नसताना त्यांनी जे घवघवतीत यश संपादन केले आहे, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version