अलिबागमध्ये नवी मुंबई लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

सहा.जिल्हा निबंधक, तथा मुद्रांक जिल्हा अधिकाऱ्यावर कारवाई
फायनल ऑर्डर देण्याकरिता तीस हजारांची लाच
| अलिबाग | भारत रांजणकर |
सहा.जिल्हा निबंधक, तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी रायगड, शैलेंद्र अर्जुन साटम यांना फाईलच्या एज्युडीकेशन करण्याकरिता पाच लाख तीस हजार रुपयांची मागणी करून तीस हजारांची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसी मधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रांनवये करीत असतात.तक्रारदार यांच्याकडे एज्युडीकेशन कामाकरिता आलेल्या तीन फाईल्स त्यांनी कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबाग येथे,जमा केल्या होत्या,तसेच त्या फाईल्सची ऑनलाइन फी भरून त्यास आवश्यक ते कागदपत्रे जोडून संबंधित कार्यलायात जमा केल्या होत्या.त्या तीन फाईलचे एज्युडीकेशन करणेकरिता कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबागयेथील सहजिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी देवेंद्र साटम यांनी प्रत्येक फाईल मागे फायनल ऑर्डर देण्याकरिता प्रत्येकी पंधरा हजार असे एकूण पंचेचाळीस हजार लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांच्याकडून नवीन सबमिट केलेली ऍग्रिमेंट फॉर जॉब वर्कची एक फाईलच्या पूर्तीकरिता आरोपी लोकसेवक यांनी पाच लाख रुपये व पूर्वी जमा केलेल्या तीन फाईल पैकी दोन फाईल व एक पेंडिंग फाईल अशा तीन एज्युकेशनच्या फाईलकरिता प्रत्येकी दहा हजार प्रमाणे तीन फाईलचे तीस हजार रुपये असे चार फाईल मिळून पाच लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

सदर कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Exit mobile version