पुन्हा इतिहास घडवा – धैर्यशील पाटील

खोपोली | संतोषी म्हात्रे |

शेकाप हा विचार व प्रश्‍न यावर काम करणारा पक्ष आहे देशाचा, राज्याचा विकास घडत असताना ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी लाल बावटा आहे. भरवसा राखण्यात कमी पडल्याने विधान सभेच्या निवडणुकीत पराभव झाला पण पुन्हा लोकांमध्ये विश्‍वास व खात्री निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. घटना कायदेशीर अथवा बेकायदेशीर असो, लोकहिताचा विचार करूनच काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. गेल्या निवडणुकीत खालापूरकरांनी नगर पंचायतीत मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन पुन्हा इतिहास घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात तांबाटी येथील अमित सावंत यांनी भाजपा सोडून पुन्हा शेकापमध्ये प्रवेश केला. होनाडचे शेकाप नेते निकेश देशमुख यांचा तसेच तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार या मेळाव्यात करण्यात आले. गुरुनाथ साठेलकर यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले.

नतीन गडकरींचे कौतूक
भाजपमध्ये नितीन गडकरींसारखे लोक कमी आहेत वधान परिषदेत विरोधी पक्ष नेते असताना नितीन गडकरी यांनी आपला वेळ आपल्यासारख्या नव्या आमदाराला दिला व आपल्याला प्रोत्साहन देऊन उच्च दर्जाचा आदर्श निर्माण केला याचे स्मरण जयंत पाटील यांनी करुन दिले.
तालुक्यात मते वाढवा
कर्जत-खालापूर विधान सभा मतदार संघात दरवेळी नवे उमेदवार देऊनही पक्षाला ठाम असलेल्यांची मते कायम मिळतात. ही मते वाढवायची आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात शेकापला सोबत घेतल्याशिवाय कोणाला राज्य करता येणार नाही असे बजावून त्यांनी आपल्या पक्षातल्या नेतृत्वाला भाड्याने मिळणारी माणसे न घेता निष्ठावंतांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन केले. तुम्हाला विचारल्याशिवाय व तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणतीही भूमिका घेणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. जयंत पाटील यांनी संदीप पाटील, अविनाश तावडे व आकेश जोशी या तिन्ही शहर चिटणीसांचे हा मेळावा उत्तम प्रकारे आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
प्रास्ताविक जिल्हा सहचिटणीस किशोर बाळकृष्ण पाटील यांनी केले. कोरोना काळात खालापूर नगर पंचायतीत शिवानी जंगम, संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड काम केल्याचे नमूद केले. श्याम कांबळे,रविंद्र रोकडे ,भूषण कडव ,उत्तम भोईर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यात अर्शल जलगावकर यांच्या नेतृत्वाखाली 25 युवकांनी शेकापमध्ये प्रवेश केला. मोठ्या जल्लोषात या पक्ष प्रवेशाचे शानदार स्वागत करण्यात आले. बाबुमामा जाधव यांच्या परिवाराकडून आ. जयंत पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

Exit mobile version