। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर एक हजार कोटींच्या अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. तसेच या खटल्याप्रकरणी नवाब मलिकांनी उत्तर देण्यास न्यायलयाकडे वेळ मागितला असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी ट्विटवरून सांगितले. तर, आरे ला कारे करीत नवाब मलिकांनीही त्यांना ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’ असं ट्विट करत प्रवीण दरेकरांना ओपन चॅलेंज केले आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर केलेला अब्रूनुकसानीचा आरोप अमान्य असल्याचे मलिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच यावेळी माझ्याकडे सर्व पुरावे असून ते न्यायालयासमोर सादर करू व आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला असल्याची माहितीही नवाब मलिकांनी दिली आहे.