| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग महादेवकोळी समाज आयोजित मल्लखांब दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 66 वर्षाची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांसह खेळाडूंनी मनमुरादपणे घेतला.
परंपरा कोळीवाड्याची असलेला मल्लखांब दहीहंडी उत्सव गेल्या अनेक वर्षपासून सुरु आहे. या उत्सवातून पारंपारिक व मर्दानी खेळ असलेल्या मल्लखांबचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अलिबाग महादेवकोळी समाज आयोजित दहीहंडीचा उत्सव शनिवारी (दि.5) दुपारी तीन वाजल्यापासून सुरु झाला. अलिबागचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. अलिबाग तालुक्यातील वेलेटवाडी, कासारभाट तसेच उत्तरप्रदेशमधील 74 स्पर्धकांनी या उत्सवात सहभाग घेतला. मल्लखांबाला ग्रीस लावल्याने उंच्च दहीहंडीपर्यंत पोहचताना स्पर्धकांची कसरत झाली होती. दहीहंडीपर्यंत पोहचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला आकर्षक चषक व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव
