माणसाने असे जगावे की त्याच्या कीर्तीचा सुंगध दरवळत राहिला पाहिजे

। रसायनी । वार्ताहर ।
पुण्यस्मरण त्यांच होते ज्यांनी आपल्या जीवनात पुण्य कमावले आहे. ज्यांनी जीवनात पुण्यधर्म केले आहे. अर्थात माणसांकडून नकळत पाप घडतात. पुण्यधर्म करण्यासाठी अट्टाहास व प्रयत्न करावा लागतो. पुण्य करण्याकरिता जीवनात सदाचार संपन्नता असणं अत्यंत आवश्यक आहे. सदाचार संपन्ननता जीवनात नसेल तर तो पुण्यकर्म करू शकत नाही.संत वाङ्मय याचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्यामध्ये असे लिहले आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरेपर्यंत जगायचा हक्क आहे. पण ते जगणे सदाचार संपन्नतेच असावे तर त्या जगण्याला अर्थ. असे कीर्तनकार आणि प्रवचनकार आनंद महाराज खंडागळे यांनी केले.

Exit mobile version