मानव ठक्कर रिटेन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यू मुम्बाने प्रतिभावंत खेळाडू मानव ठक्करला आगामी अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) 2024 हंगामासाठी कायम (रिटेन) ठेवले आहे. मानवसह आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू मनिका बत्रा या पाच खेळाडूंना त्यांच्या संबंधित फ्रँचायझींनी रिटेन केले आहे. यंदाची स्पर्धा 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. तसेच, गेल्या मोसमातील उपविजेत्या चेन्नई लायन्सने दिग्गज खेळाडू शरथ कमलचा करार कायम ठेवला. बेंगळुरू स्मॅशर्सने सर्वोच्च रँकिंगवर असलेली भारताची अव्वल टेबलटेनिसपटू बत्रा हिच्यावर पुन्हा विश्‍वास दाखवला आहे. एकूणच सर्वच फ्रँचायझींनी आगामी हंगामासाठी त्यांच्या अव्वल पॅडलर्ससोबत राहणे पसंत केले.

Exit mobile version