। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरूडमध्ये रविवारी (दि.18) मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन भंडारी बोर्डिंग येथे करण्यात आले होते. या मंगळागौर नुर्त्य स्पर्धेसाठी मुरुड तालुक्यातील विवीध ठिकाणाहून 12 संघ सहभागी झाले होते. यावेळी मुरूड येथील संत नामदेव शिंपी समाजाच्या महिला मंडळाचा प्रथम क्रमांक आला. त्यांना 20 हजार रोख रकमेचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हे बक्षीस शिवानी नाझरे, रोशनी सद्रे व राजश्री सद्रे यांनी बक्षीस स्वीकारले.
द्वितीय पारितोषिक ब्राह्मण समाज महिला सखी ग्रुप मुरुड यांचा 15 हजार रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. हे बक्षीस तनुजा गोबरे, स्नेहा गद्रे, समिधा उपाध्ये, अस्मिता पेंडसे, शुभांगी जोशी, सुषमा जोशी, कांचन जोशी, जयश्री जोशी, सानिका देवगणे आदींनी हे बक्षीस स्वीकारले. तृतीय बक्षीस रायगडची हिरकणी नांदगाव-मुरुड यांना 10 हजार रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, उत्तेजनार्थ घे भरारी नांदगाव मंडळ यांचा गौरव करण्यात आला.