। पनवेल । वार्ताहर ।
मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ केंद्र सरकार आणि मणिपूर राज्य सरकारचा जाहीर निदर्शने रविवारी सकाळी 11 वाजता संविधान कट्टा, खांदा कॉलनी, पनवेल येथे करण्यात आले. यावेळी सुवर्णा सावंत, प्रणाली, शैला कांबळे,धनश्री, संविधान प्रचारक प्रविण जठार, चित्रकार उत्तम घोष, संदीप भालेराव, महेन्द्र कांबळे, मारूती शेरकर, वामन मोरे, विजय खरात, डॉ. सपकाळ, सचिन धभाडे अरविंद लोहार,अनिस पनवेल शाखेचे वैभव, मेश्राम सर आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामजिक व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मणिपूर घटनेचा पनवेलमध्ये निषेध
