मनीषा कांबळे यांचे निधन

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुका बौद्धजन पंचायत ग्रुप नं 7चे मा.अध्यक्ष अध्यक्ष तथा कानसळ गावचे पोलीस पाटील राहुल कांबळे यांच्या मातोश्री दिवंगत मनीषा पिठू कांबळे यांचे दि.20 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्या 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अंत्यविधीला सुधागड तालुक्यातील सामाजिक, राजकीय मंडळी, नातेवाईक व सगेसोयरे बहुसंख्येने उपस्थित होते. मनीषा कांबळे यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम कानसळ येथील राहत्या घरी रविवार, दि. 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Exit mobile version