संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी मनोज भगत

। उरण । वार्ताहर ।
संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज भगत यांची निवड करण्यात आली आहे. मनोज भगत यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तालुका अध्यक्ष मनोज भगत यांची उरण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. याबद्दल तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पुष्पगुच्छ देऊन मनोज भगत यांचे अभिनंदन केले. संजय गांधी निराधार योजनेची सविस्तर माहिती तहसीलदार अंधारे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज भगत यांना दिली. यावेळी प्रशांत पाटील, भार्गव पाटील, समाधान म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संतोष ठाकूर, भूषण ठाकूर, डी. जी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version